Ind vs Eng: WTCच्या अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला? आज निर्णय

भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज

Updated: Mar 4, 2021, 08:08 AM IST
Ind vs Eng: WTCच्या अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला? आज निर्णय title=

अहमदाबाद: वर्ल्ड चेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी कोणाची निवड होणार याचा निर्णय या 4 दिवसांत होणार आहे. याचं कारण भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यंच्या मालिकेतील शेवटचा आणि अंतिम सामना आज खेळवला जात आहे. 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळाला तर WTCच्या अंतिम सामन्यात खेळण्याचं भारतीय संघाचं स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात जिंकण्याचं आव्हान आहे.

भारतीय संघानं 2-1नं आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडच्या संघाला तंबूत धाडण्यात भारतीय संघाला मोठं यश मिळालं. आर अश्विन, अक्षर पटेल या गोलंदाजांनी इंग्लंड संघाच्या फलंदाजांची दांडी गुल केली.

कशी असेल संभाव्य टीम
भारतः रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुधर, इशांत शर्मा आणि उमेश यादव.

इंग्लंड: डोमिनिक सिब्ली, जॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फॉक्स (विकेटकीपर), डोम बेस, जॅक लीच, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की चौथ्या कसोटीतील खेळपट्टी दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांप्रमाणेच राहू शकते. इंग्लंडने या खेळपट्टीवर चांगली कामगिरी बजावली तर ते भारतासाठी धोकादायक ठरेल. पहिल्यांदाच फलंदाजी घेतल्यानंतर जर इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारली तर दुसर्‍या डावात भारताला समस्या उद्भवू शकतात.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटी सामन्याआधी संघातून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने संघातून माघार घेतली आहे. तर त्याच्या जागी उमेद यादवला संघात संधी दिली जाऊ शकते अशीही चर्चा आहे.