मुंबई : दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये खेळवण्याची संधी दिली नाही. आता आयर्लंड सीरिजमध्ये दोन नव्या खेळाडूंचं पदार्पण होण्याची दाट शक्यता आहे. या खेळाडूंना संधी मिळू शकते. 26 जूनपासून भारत विरुद्ध आयर्लंड 2 सामन्यांची टी-20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहे.
या दोन्ही खेळाडूंचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आयर्लंड दौऱ्यावर पहिल्या टी-20 सामन्यात या दोन खेळाडूंची परीक्षा घेतली जाऊ शकते.
उमरान आणि आर्शदीपने आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली होती. उमरानने तर सर्वात वेगवान बॉल टाकून अनोखा रेकॉर्ड मोडला. तर जसप्रीत बुमराहचा रेकॉर्डही आयपीएलमधील उमरानने मोडला होता.
या दोन्ही खेळाडूंनी जर या सीरिजमध्ये उत्तम कामगिरी केली तर त्यांना टी 20 वर्ल्ड कपसाठी खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे निवड समिती आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देऊन आजमावू शकतात.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन/राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार.