दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, कर्णधारपदही गमावलं, पदार्पणातच शतकी खेळीसह 5 रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध अय्यरचा डंका

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Testt) यांच्यातील पहिल्या कसोटीत मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणात शतक ठोकलं.   

Updated: Nov 26, 2021, 04:14 PM IST
दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, कर्णधारपदही गमावलं, पदार्पणातच शतकी खेळीसह 5 रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध अय्यरचा डंका title=

कानपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Testt) यांच्यातील पहिल्या कसोटीत मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणात शतक ठोकलं. श्रेयस सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 105 धावा करुन बाद झाला. श्रेयसने या शतकासह 5 रेकॉर्ड केले. श्रेयसने नक्की कोणते रेकॉर्ड हे केलेत, हे आपण जाणून घेऊयात. (India vs New Zealand 1st test 2 nd day debutant shreyas iyer scored hundred and makes 5 records at Green Park Kanpur)

एकूण 16 वा भारतीय 

श्रेयसने शतक ठोकताच दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलं. श्रेयस टेस्ट डेब्यूत सेंच्यूरी लगावणारा 16 वा भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे श्रेयस या शतकासह पदार्पणात शतक लगावणारा सलग तिसरा तर एकूण चौथा मुंबईकर ठरला.

श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणात शतक लगावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय. श्रेयसआधी सुरिंदर अमरनाथ आणि एजी कृपाल सिंह या दोघांनी हा कारनामा केलाय.
 
न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणात शतक लगावणारा तिसरा भारतीय

सुरिंदर अमरनाथ - 124 धावा 1976, ऑकलंड 

एजी कृपाल सिंह - 100 धावा*, 1955, हैदराबाद 

श्रेयस अय्यर पदार्पणातील सामन्यातील पहिल्याच डावात शतक लगावणारा शतक लगावणारा 13 वा भारतीय ठरला. 

तसेच भारतात पदार्पण करुन शतक लगावणारा श्रेयस 10 वा क्रिकेटपटू ठरला आहे. 

कानपूरमध्ये पदार्पणात शतक  

श्रेयस कानपूरमध्ये पदार्पणात शतक लगावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी गुंडाप्पा विश्वनाथ यांनी 1969 मध्ये ही कामगिरी केली होती. 

टीम इंडियाचा पहिला डाव

टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून डेब्युटंट श्रेयस अय्यरने 171 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह  105 रन्स केल्या. तर शुबमन गिल आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी अनुक्रमे 52 आणि 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर कायले जेमीन्सनने 3 आणि अझाज पटेलने 2 विकेट्स घेत साऊथीला चांगली साथ दिली.

श्रेयसचा संघर्ष

श्रेयस अय्यरला आयपीएलच्या 14 व्या मोसमात सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.ही दुखापत श्रेयसला इतकी महागात पडली की त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

श्रेयसने माघार घेतल्याने रिषभ पंतला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे श्रेयस गेल्या 2 वर्षांपासून रेड बॉल क्रिकेटपासून दूर होता. मात्र याचा काहीही परिणाम श्रेयसने आपल्या कामगिरीवर होवून दिला नाही. या मधल्या काळात श्रेयसने कसून सराव केला.

श्रेयसने या मधल्या काळात घेतलेल्या मेहनतीचं फळ हे त्याला पदार्पणातील सामन्यात मिळालं. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयसला पदार्पणाची संधी देण्यात आली. श्रेयसने या संधीचं सोनं केलं. दरम्यान आता दुसऱ्या डावात श्रेयस किवी गोलंदाजांचा कसा सामना करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.