Ravichandran Ashwin | अश्विनने या दिग्गजाला पछाडलं, आता हरभजनला धोका

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran ashwin) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील (India vs New Zealand 1st test) पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या.

Updated: Nov 27, 2021, 07:46 PM IST
Ravichandran Ashwin | अश्विनने या दिग्गजाला पछाडलं, आता हरभजनला धोका

कानपूर | टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत कारनामा केलाय. अश्विनने या सामन्यातील पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या. यासह अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अश्विनने कायले जेमिन्सला आऊट करत (Kyle Jamieson) हा विक्रम मोडित काढला आहे. तसेच आता अश्विनला टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहला पछाडण्याचीही संधी आहे. (india vs new zealand 1st test day 3 Ravichandran ashwin break pakistan former bowler wasim akram test wickets records)

काय आहे रेकॉर्ड?

अश्विनने यासह पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमचा (Wasim Akram) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अश्विनने कसोटी कारकिर्दीत 416 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अश्विनने कारकिर्दीतील 80 व्या सामन्यातील 149 डावात ही कामगिरी केली आहे. अक्रमच्या नावे 414 विकेट्सची नोंद आहे. अक्रमने 104 सामन्यात 414 विकेट्स घेतल्या होत्या.  

हरभजनला मागे टाकण्यासाठी 1 विकेट 

दरम्यान आता अश्विनची नजर ही हरभजनच्या रेकॉर्डवर असणार आहे. हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी अश्विनला केवळ 1 विकेटची गरज आहे. हरभजनने 103 सामन्यात 417 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता अश्विन अक्रमनंतर हरभजनचाही विक्रम याच सामन्यात मोडणार का, याकडे लक्ष असणार आहे.  

टीम इंडियाकडे 49 धावांची आघाडी

दरम्यान टीम इंडियाला दुसऱ्या डावात 49 धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडिया न्यूझीलंडसमोर  किती धावांचे आव्हान ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.