मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील (IND vs NZ Test Series) दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना हा मुंबईतील (Wankhede Stadium) वानखेडे स्टेडियमवर 3-7 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती दिल्याने पहिल्या कसोटीत उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कर्णधार करण्यात आलं. मात्र दुसऱ्या सामन्यात विश्रांतीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली मैदानात उतरणार आहे. त्यामुळे विराटसाठी या दुसऱ्या सामन्यात कोण बलिदान देणार, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्याचं लक्ष लागलेलं आहे. विराटसाठी कोणाचा पत्ता कट करायचा, या प्रश्नामुळे टीम मॅनेजमेंटच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. (india vs new zealand 2nd test who will lose his position in playing eleven due to virat kohli comeback)
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे अनुभवी फलंदाज संघर्ष करतायेत. तर दुसऱ्या बाजूला विराटच्या जागी पदार्पणाची संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरने धमाका केला. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक केलं. यामुळे आता विराटसाठी संघातून कोणाला वगळायचं, हा मोठा पेच टीम मॅनेजमेंटसमोर आहे.
कोणाला डच्चू मिळणार?
विराटसाठी संघातून शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल या सलामी जोडीला हात लावता येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला 5 गोलंदाज आहेत. यामध्ये 3 ऑलराऊंडर आणि 2 फास्टर बॉलर आहेत. मात्र विराट फलंदाज आहेत. त्यामुळे साहजिक आहे की कोणा एका फलंदाजालाच बाहेर बसावं लागेल. पण तो फलंदाज कोण असणार हा मोठा प्रश्न आहे.
अजिंक्य आणि पुजाराचा संघर्ष
अजिंक्य आणि पुजारा हे दोघे टीम इंडियाचे महत्त्वाचे आणि अनुभवी फलंदाज आहेत. विराटच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत या दोघांवर जबाबदारी होती. मात्र दोघेही अपयशी ठरले. अजिंक्यने गेल्या 16 सामन्यांमध्ये 25 च्या एव्हरेजने धावा केल्या आहेत. या सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीमुळे रहाणेला दुसऱ्या कसोटीतून डच्चू मिळू शकतो.