IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट

IND vs NZ 2nd T20 : क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज माऊंट मौनगानुई येथे खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, पहिल्या सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.

Updated: Nov 20, 2022, 06:48 AM IST
IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट title=

IND vs NZ 2nd T20 Weather-Rain Updates: भारत - न्यूझीलंड मालिकेतील पहिला  T20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर वेलिंग्टनमधील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्याची वेळ आली. आजही दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. 

मालिकेतील पहिला T20 सामना नाणेफेक न होता पावसात वाहून गेला. त्यामुळे बे-ओव्हल मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्यावरही पावसाचे सावट दिसत आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे. या T20 मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यावर टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

पहिला T20 सामना पावसात वाहून गेला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर वेलिंग्टनमधील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि अखेर सामना अधिकाऱ्यांनी एकही चेंडू न टाकता तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. आता दोन्ही संघ माऊंट मौनगानुई येथे पोहोचले आहेत, पण दुसरा T20 सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. 

दुसऱ्या T20 सामन्यावरही पावसाचे सावट

आज होणारा सामना पाहण्याच्या उद्देशाने बे-ओव्हल मैदानावर पोहोचणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर हवामानामुळे विरजण पडू शकते. Accuweather च्या अहवालानुसार, 20 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी माउंट माउंटगुईमध्ये 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार ताशी 24 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, दिवसाचे तापमान कमाल 19 अंश आणि किमान 15 अंशांपर्यंत राहू शकते. म्हणजेच या सामन्यात पाऊस पुन्हा अडथळा ठरु शकतो.

सामना रद्द झाला तर?

पाऊस आणि खराब हवामानामुळे दुसरा T20 सामना रद्द झाला तर 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल. अशा परिस्थितीत जो संघ तिसरा टी-20 सामना जिंकेल त्याला ट्रॉफी दिली जाईल. अलीकडेच भारत आणि न्यूझीलंडचे संघ T20 विश्वचषक-2022 मध्ये खेळत होते, दोघांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला आणि न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. 

वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती  

न्यूझीलंड दौऱ्यातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली, अनुभवी दिनेश कार्तिक, सलामीवीर केएल राहुल यांच्यासह अनेक खेळाडू या दौऱ्याचा सहभागी नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संघात शुभमन गिल देखील आहे जो त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत आहे.