BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं?

Rohit Sharma & Virat Kohli: स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही.  BCCI ने टीमच्या दोन खेळाडूंना T20 मधून कायमचे काढून टाकले आहे.

Updated: Jan 14, 2023, 12:52 PM IST
BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं? title=

India vs New Zealand T20: T20 विश्वचषक 2022 नंतर भारतीय संघात अनेक चढउतार पाहायला मिळत आहे. भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यामधील टी 20 मालिका टीम इंडियाने जिंकली. चालू वर्षातील पहिलीच मालिका भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात जिंकली आहे.  मात्र या सगळ्यात टीम इंडियाच्या (team India) कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ने टीम इंडियातील दोन स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना कायमस्वरूपी T20 मधून कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध (Ind vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी 20 मालिकेसाठी भारतीय निवड समितीने नुकताच संघ जाहीर केला. या मालिकेसाठी दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा संघात समावेश नाही. कारण बीसीआयने रोहित-विराटला टी-20 संघातून कायमचे वगळले आहे. तसेच बीसीआचे चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती आता कायमस्वरूपी टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे दिली.

वाचा: अखेर Suryakumar yadav चं स्वप्न पूर्ण; टेस्ट टीममध्ये एन्ट्री झालीच!  

या खेळाडूंचे संघात पुनरागमन नाही

विराट कोहली आणि रोहित शर्मासोबतच मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन आणि दिनेश कार्तिक यांनाही टी-20 संघात पुनरागमन होणे कठीण आहे. 

रोहित-विराटचे टी-20 करिअर

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर या सामन्यांच्या 140 डावांमध्ये त्याने 31.32 च्या सरासरीने आणि 139.24 च्या स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत. तर दुसरीकडे विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 107 डावांमध्ये त्याने 52.73 च्या सरासरीने आणि 137.96 च्या स्ट्राईक रेटने 4008 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 37अर्धशतके केली आहेत.

भारतीय T20 संघ न्यूझीलंड विरुद्ध

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.