टीम इंडियाने राजकोटमधील या ५ चुका करू नये, गमावावी लागेल सीरिज

राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला ४० रन्सनी मात दिली. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सनी मात दिली होती.

Updated: Nov 7, 2017, 07:59 AM IST
टीम इंडियाने राजकोटमधील या ५ चुका करू नये, गमावावी लागेल सीरिज title=

नवी दिल्ली : राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला ४० रन्सनी मात दिली. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सनी मात दिली होती.

आता सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सामना आज (मंगळवारी) तिरूवनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही टीम्ससाठी निर्णायक ठरणार आहे. याआधी टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये २-१ ने विजय मिळवला होता. 

दुस-या सामन्यात टीम इंडियाने अनेक चुका केल्या, ज्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली. आता पुन्हा त्याच चुका शेवटच्या सामन्यात केल्या तर टीम इंडियाला महागात पडणार आहे. राजकोटमध्ये टीम इंडियाने काय चुका केल्या त्यावर एक नजर टाकूया....

- कॅच सोडल्या - राजकोटमध्ये टीम इंडियाची फिल्डींग फारच वाईट होती. त्यामुळेच न्यूझीलंडने १९६ रन्सचं टार्गेट दिलं होतं. यासोबतच टीमच्या खेळाडूंनी अनेक कॅच सोडल्या त्याचाही फटका बसला. ११व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर श्रेयस अय्यरने कॉलिन मुनरोची कॅच सोडली. त्यानंतर १६व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर युजवेंद्र चहल याने पुन्हा एकदा मुनरोची कॅच सोडली. या दोन कॅच सोडल्याने टी-२० मध्ये मुनरोने शतक केलं. 

- चहलची निराशाजनक गोलंदाजी - युजवेंद्र चहल आपल्या शानदार आणि इकॉनॉमिकल गोलंदाजीमुळे राजकोटच्या प्लेईंग ११ मध्ये होता. पण याच सामन्यात त्याने निराशाजनक गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गुप्टिलने २ सिक्सर आणि १ फोर लगावला. चहलने पहिल्याच ओव्हरमध्ये १७ रन्स दिले. चहलने दुसरा ओव्हर चांगला टाकला, त्यात त्याने केवळ ४ रन्स दिले. पण १०व्या ओव्हरमध्ये चहलने पुन्हा १० रन्स दिले. यात एक सिक्सरही होता. चहलने आपल्या चौथ्या ओव्हरमध्ये मार्टिन गुप्टिलला आऊट केले. पण या एका विकेटसाठी त्याने चार ओव्हरमध्ये ३६ रन्स दिले. 

- ओपनरचं अपयश - न्यूझीलंड विरूद्ध पहिल्या टी-२० मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी विजयी खेळी केली होती. पण राजकोटमध्ये दोन्ही ओपनर चांगले खेळू शकले नाही. धवनला ट्रेंट बोल्डने दुस-याच ओव्हरमध्ये बोल्ड केलं. धवनने केवळ १ रन केला. याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रोहितची विकेट गेली. रोहितने ५ रन केले. 
 
- पांड्याचं निराशाजनक प्रदर्शन - हार्दिक पांड्याने अनेक सामन्यांमध्ये चांगला खेळ केलाय. पण गेल्या काही सामन्यात त्याचं प्रदर्शन खराब होत गेलं. पहिल्या टी-२० मध्ये पांड्या एकही रन न करता आऊट झाला. राजकोटमधेही तो एकच रन काढून आऊट झाला. पांड्याला धोनीच्या आधी फलंदाजीसाठी पाठ्वण्यात आलं होतं. पण त्याने निराशा केली. त्यासोबतच त्याने एक ओव्हर टाकला त्यात त्याने तब्बल १४ रन्स दिले. एकही विकेट घेतली नाही. 

- धोनीची स्लो फलंदाजी - महेंद्र सिंह धोनीला गेम फिनिशर म्हणून ओळखलं जातं. पण राजकोटमध्ये तो तसे करण्यास अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीसोबत तो स्ट्राईक रोटेटही करू शकला नाही. त्यामुळे दोघांवरही दबाव वाढला. कोहलीने ६५ रन्स केले. धोनीने ४ फोर आणि ३ सिक्सर लगवाले पण ते विजयासाठी अपुरे होते.