'आशिया कपमध्ये विराट नसला तरी पाकिस्तानवर दबाव'

आशिया कपसाठी भारतीय टीमनं कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे.

Updated: Sep 5, 2018, 07:49 PM IST
'आशिया कपमध्ये विराट नसला तरी पाकिस्तानवर दबाव' title=

लाहोर : आशिया कपसाठी भारतीय टीमनं कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. पण विराट भारतीय टीममध्ये नसला तरी आमच्यावर दबाव असेल, असं पाकिस्तानचा क्रिकेटपटू फकर जमान म्हणाला आहे. भारताची टीम ही सर्वोत्तम आहे, त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीचा त्यांना फारसा फरक पडणार नाही. कोहली एक शानदार खेळाडू आहे. पण भारतीय टीम मजबूत आहे. त्यामुळे पाकिस्तानला सोपं जाणार नाही. पण आम्ही याला जास्त महत्त्व देत नाही, असं फकर जमानला वाटतंय.

भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान दोन्ही टीमवर दबाव असणार. तुम्ही आंतरराष्ट्रीय मॅच खेळता तेव्हा तुमच्यावर दबाव असतोच. पण भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान हा दबाव वाढतो. जी टीम शांत राहिल आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल त्यांचा विजय होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी याचा अनुभव घेतला आहे, असं वक्तव्य फकर जमाननं केलंय.

२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये फकर झमाननं ११४ रनची खेळी केली होती. या मॅचमध्ये पाकिस्तानचा १८० रननं विजय झाला होता. या मॅचनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. १९ सप्टेंबरला हा सामना होणार आहे. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे.