भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या

ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2023, 12:55 PM IST
भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या title=
India Vs Pakistan World Cup 2023 Special trains from Mumbai to Ahmedabad on 14 oct

India Vs Pakistan World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 8 सामने खेळवण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध भारत सामना खेळवला जाणार आहे. तर, 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे.  या सामन्यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेनेही विशेष तयारी केली आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी स्पेशन ट्रेनचे नियोजन केले आहे. 

पश्चिम रेल्वे मुंबई-अहमदाबाद दरम्यान दोन स्पेशल ट्रेन चालवणार आहेत. यामध्ये वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे. क्रिकेट सामन्यासाठी विशेष ट्रेन चालवण्यात येण्याची ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना असणार आहे. भारत-पाक सामना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अहमहादाबमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. पश्चिम रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामनाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा व सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन ट्रेन चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस 13 ऑक्टोबर रोजी रात्री 10 सुमारास मुंबईहून सुटेल आणि 14 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास 6 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. तर, 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सामन्याच्या दिवशी दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे पाच वाजता सुटेल आणि 12 पर्यंत अहमदाबादला पोहोचेल. सूत्रांनुसार, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून सामन्याच्या दिवशी पहाटे निघणे अपेक्षित आहे. जेणेकरून प्रेक्षक अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेळेत पोहोचू शकतील. 

दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून अद्याप ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे निश्चित करण्यात आलेले नाहीयेत. पण सूरत, वडोदरा, आनंद आणि भरूच यासारख्या स्थानकांत ट्रेन थांबण्याची शक्यता आहे. 

आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना 

वर्ल्डकपमधील आज भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानसोबत रंगणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर हा सामना रंगणार असून यावेळी टीम इंडियामध्ये अनेक बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरूद्ध इंडियाची अशी संभाव्य टीम असेल. यात रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकते.