नवी दिल्ली: चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करणारी टीम इंडिया कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सज्ज झाली आहे. आज (मंगळावर, १३ फेब्रुवारी) पोर्ट एलिजाबेथ येथे होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामनात विजय मिळविण्याची आस टीम इंडियाला आहे.
दरम्यान, पाचवा एकदिवसीय सामना जिंकून दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच त्यांच्या होम ग्राऊंडवर मालिका जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी भारताला आहे. भारताने सहा सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. मात्र, चौथ्या एक दिवसीय सामन्यात मेजबानने पुनरागमण केले आणि मालिका बरोबरीत आणून ठेवली. त्यामुळे मालिका कुणाची यावर जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य लागले आहे. आजचा दिवस दक्षिण अफ्रिका आणि भारत दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, दोघांपैकी जो विजयी होईल त्याचे मालिकेवर नाव लिहीले जाणार आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची दक्षिण अफ्रिकेतील कामगिरी पाहता ती अत्यंत सुमार आहे. इतकी की, गेल्या काही वर्षात भारताला दक्षिण अफ्रिकेच्या मैदानवर अपवाद वगळता एकही सामना जिंकता आला नाही. यात विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाची सूत्रे हाती घेतल्यावर काहीसा बदल झाला. आजचा सामना जिंकल्यास मालिका भारताच्या खिशात येईल. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर भारताच्या कपाळाला लागलेला पराभवाचा कलंक पुसण्यास मदत होईल.