close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रवींद्र जडेजाचा विक्रम; हा रेकॉर्ड करणारा जगातला पहिलाच खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रवींद्र जडेजाने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Oct 4, 2019, 04:52 PM IST
रवींद्र जडेजाचा विक्रम; हा रेकॉर्ड करणारा जगातला पहिलाच खेळाडू

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रवींद्र जडेजाने विक्रमाला गवसणी घातली आहे. रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २०० विकेटचा टप्पा गाठणारा डावखुरा बॉलर ठरला आहे. रवींद्र जडेजाने ४४ टेस्ट मॅचमध्येच २०० विकेट घेतल्या आहेत. तर श्रीलंकेच्या रंगना हेराथला २०० विकेट घ्यायला ४७ टेस्टची गरज लागली. मिचेल जॉनसने ४९ टेस्टमध्ये, मिचेल स्टार्कने ५० टेस्टमध्ये तर बिशनसिंग बेदी आणि वसीम अक्रम यांनी ५१ टेस्टमध्ये २०० विकेट घेतल्या.

रवींद्र जडेजाने डीन एल्गारला १६० रनवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आणि त्याच्या २०० विकेट पूर्ण केल्या. डिन एल्गारबरोबरच क्विंटन डिकॉकनेही त्याचं शतक पूर्ण केलं. डिकॉक १११ रनवर आऊट झाला. तर कर्णधार फॅफ डुप्लेसिसनेही अर्धशतकी खेळी केली.

रवींद्र जडेजाने ४४ टेस्टच्या ८३ इनिंगमध्ये २.४२ ची इकोनॉमी आणि २४.२२ च्या सरासरीने २०० विकेटचा टप्पा गाठला. जडेजाने ९ वेळा इनिंगमध्ये ५ विकेट आणि १ वेळा १० विकेट घेतल्या. तर बॅटिंग करताना जडेजाने ३३.१२च्या सरासरीने १,५९० रन केले. यामध्ये १ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.