कोलंबो : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे.
या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहित शर्मा उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्य़ासाठी टीम इंडिया सज्ज झालीये.
मात्र रोहितच्या फॉर्मची संघाला चिंता आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजपासून रोहित फॉर्मात नाहीये. त्यामुळे या सामन्यात तरी त्याला सूर गवसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्पर्धेत रिषभ पंतला आणखी एक संधी देण्याबाबत विचार केला जाणार आहे.
स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने बांगलादेशला हरवले. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ६ विकेटनी मात केली.
त्यामुळे आजचा हा सामना पहिल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारण्यासाठीची चांगली संधी आहे. स्पर्धेत तिनही संघाकडे समान संधी आहे कारण तिघांनीही दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवलाय. दरम्यान नेट रनरेटच्या जोरावर श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे. मात्र आजच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास ते अव्वल स्थानी येऊ शकतात.
सामन्याची वेळ - संध्याकाळी ७ वाजत
कुठे पाहाल ? - डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकुर, जयदेव उनदकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (विकेटकीपर).
श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), सूरंगा लकमल (उप कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल जनिथ परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डि सिल्वा.