IND vs WI : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पाहा त्या खास लोकांपैकी तुम्हीही एक आहात का?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या T20 सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी

Updated: Feb 17, 2022, 05:21 PM IST
IND vs WI : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पाहा त्या खास लोकांपैकी तुम्हीही एक आहात का?  title=

मुंबई : भारत विरुद्ध टी 20 पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. त्यानंतर क्रिकेटप्रेमी आणि रसिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अखेर प्रतीक्षा संपली असून आता क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनला तिसरा टी 20 सामना होणार आहे. 

3 सामन्यांच्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामना पाहण्यासाठी 20 हजार क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये संधी मिळू शकते. यासाठी तुम्हीही लकी ठरू शकता. तुम्ही तातडीनं तिकीट बुक केलं नसेल तर आजच खटपट करा. 

BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघ प्रमुख अविषेक डालमिया यांनी ई मेल केला. त्यामध्ये त्यांनी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मागण्याबाबतही ई मेलमध्ये उल्लेख केला होता. त्यानुसार क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये जाता येणार आहे. 

याआधी काही खास व्यक्तींनाच स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार 2000 लोकचं स्टेडियममध्ये पहिल्या सामन्यासाठी उपस्थित होते. दुसरा सामनाही अशाच स्वरुपाचा असणार आहे. मात्र तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये live सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.