मुंबई : टीम इंडियाचा (Team india) माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या फॉर्मपासून झुंजतोय. त्याच्या या इनफॉर्म कामगिरीवर भारताच्या माजी क्रिकेटरपासून अनेक दिग्गज खेळाडू टीका करताना दिसत आहे. त्यात आता विराट कोहली 1 जुलैला इग्लंडविरूद्ध टेस्ट सामना खेळणार आहे.या सामन्यापूर्वीचं भारताच्या माजी क्रिकेटपटू विराटवर टीका केली.
गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहली एकही शतक ठोकू शकला नाहीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल, विराट कोहलीची बॅट धावांचा पाऊस पाडण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.
विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. आता विराट कोहली १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी (England test) सामना खेळताना दिसणार आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यापूर्वी विराटच्या फॉर्मवर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अनकटवरील संभाषणात ते बोलत होते.
लोकांकडून गप्प बसण्याची अपेक्षा करू नका
'जर तुम्ही धावा केल्या नाहीत, तर लोकांना वाटेल की कुठेतरी काहीतरी चूक आहे. लोक फक्त तुमचा परफॉर्मन्स पाहतात. तुमचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर लोकांनी गप्प बसण्याची अपेक्षा करू नका. तुमची फलंदाजी आणि कामगिरी बोलली पाहिजे, असे कपिल देव (Kapil dev) म्हणाले आहेत.
तुमच्या खेळाने चुकीचे सिद्ध करा
कपिल देव म्हणाले, 'तुम्ही तुमच्या खेळाने आम्हाला चुकीचे सिद्ध केले तर आम्ही ते मान्य करू. विराट कोहलीसारखा मोठा खेळाडू शतकाची वाट पाहतोय हे पाहून दु:ख वाटते. विराट कोहली आमच्यासाठी हिरोसारखा आहे. आज विराट कोहलीची तुलना सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली जाते, पण असा खेळाडू आपल्याला मिळेल असे कधीच वाटले नव्हते.