मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये कर्णधारपदावरून काही वाद आहे का? असा प्रश्न गेले काही दिवस अनेकांना पडला होता. कोहलीचं कर्णधारपद कसं गेलं यावरही अनेक चर्चा झाल्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम स्वत: कसोटी कर्णधार विराट कोहलीनं लावला आहे.
वन डेचं कर्णधारपद कसं गेलं आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामन्या विराट कोहली खेळणार की नाही याबाबतही कोहलीनं पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. विराट कोहलीनं कर्णधारपद कसं गेलं याबाबत मोठा खुलासा केला आहे.
माझ्याबद्दल गेल्या काही दिवसात अनेक उलट-सुलट गोष्टी समोर आल्या. या सगळ्या अफवा आहेत. कसोटी संघ निवडण्याच्या दीड तास आधी माझ्याशी निवड समितीनं संपर्क साधला. कसोटी संघाची चर्चा झाली.
फोन कॉलच्या शेवटच्या 5 मिनिटं आधी पाच निवडकर्त्यांनी मला सांगितले की, मी वन डे संघाचे नेतृत्व करणार नाही. मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य केला. विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
रोहित शर्मा आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही. शिवाय आमच्या नाराजीही नाही. मी वन डे सीरिजसाठी उपलब्ध आहे. असंही विराट कोहलीनं यावेळी सांगितलं. माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतेही प्रॉब्लेम नाही हे सांगून मी आता थकलो आहे.
No problem between me and Rohit, have been clarifying for two years. I am tired now: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021
After discussion on Test team, chief selector told me I won't be ODI captain: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021