लॉकडाऊनने बदललं माहीचं रुप; पाहून तुम्हीही म्हणाल.....

माही पुन्हा चर्चेत.... 

Updated: May 12, 2020, 06:42 PM IST
लॉकडाऊनने बदललं माहीचं रुप; पाहून तुम्हीही म्हणाल.....
छाया सौजन्य- सोशल मीडिया

रांची : देशभरात लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होऊन आता दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या काळात जवळपास सर्व व्यहार ठप्प झाले. कला, क्रीडा, उद्योग जगतामधील घडामोडीही थंडावल्या. सोशल मीडियावर याचे पडसाद पाहायला मिळाले. 

हे पडसाद अतिशय रंजक आणि तितकेच रंजक होते हे मात्र नाकारता येणार नाही. याच सोशल मीडियाच्या वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो म्हणजे क्रिकेट विश्वात आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी. माही गेल्या काही काळापासून क्रिकेच्या मैदानापासून दूर आहे. पण, असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र तो बऱ्यापैकी सक्रिय आहे. माहीपेक्षाही माहीची पत्नी सोशल मीडियावर त्याची बहुविध रुपं सर्वांच्या भेटीला आणत असते. यावेळी असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, चेन्नई संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन. 

सध्या त्याचं असंच एक रुप पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये माहीला प्रथमत: ओळखताही येणं अशक्य असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं एकंदर रुप पाहता लॉकडाऊनने त्याचाही हा असा कायापालट केला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये माहीचं वाढतं वय स्पष्टपणे दिसत आहे. 

सध्या सर्वांप्रमाणेच धोनी त्याच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करत आहे. मुलगी आणि पत्नीसमवेत तो काही खास क्षणांचा आनंद घेत आहे. याची प्रतिची पुन्हा एकदा हा व्हिडिओ देत आहे.