जकार्ता : आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारतीय पुरुष हॉकी टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने हाँगकाँगचा चक्क 26-0 ने पराभव केला आहे. भारताने 86 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढत मोठा इतिहास रचला आहे. 1932 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 ने पराभव केला होता. पण भारताने आज स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. याआधी भारताने 17-0 ने देखील विजय मिळवला आहे.
या सामन्यामध्ये भारताने सुरुवातीपासूनच लीड बनवली होती. याआधी टीमने 18 व्या आशियाई स्पर्धेत भारतीय टीमने जबरदस्त सुरुवात केली होती. या सामन्यात भारताच्या 4 खेळाडूंनी गोलची हॅट्ट्रीक केली आहे.
पहिल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 17-0 ने पराभव केला होता. हा भारताचा आशियाई स्पर्धेतला सर्वात मोठा विजय होता. भारताच्या 9 पेक्षा अधिक खेळाडूंनी या सामन्यात गोल केले. भारतीय हॉकीच्या इतिहासात 86 वर्षानंतर हा क्षण आला जेव्हा भारताने इतका मोठा विजय मिळवला आहे.