'तो काय नेहमीच...', धोनी रिव्ह्रूय सिस्टीमवरुन भारतीय अम्पायरने लगावला टोला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या अचूनक रिव्ह्यूसाठी ओळखला जातो. धोनीने चाहते यामुळेच DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम (Dhoni Review System) म्हणतात.   

शिवराज यादव | Updated: Sep 3, 2024, 02:41 PM IST
'तो काय नेहमीच...', धोनी रिव्ह्रूय सिस्टीमवरुन भारतीय अम्पायरने लगावला टोला title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा नेहमीच आपली हुशारी, शांत स्वभाव, खेळाची योग्य जाण तसंच निश्चित धोरणं यासाठी ओळखला जातो. मैदानात खेळताना जेव्हा कधी महेंद्रसिंग धोनी डीआरएसची (Decision Review System) मागणी करतो तेव्हा तो चुकीचा असण्याची शक्यता फारच कमी असते. धोनीच्या याच अचूकतेमुळे चाहत्यांनी डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टम असं नाव दिलं आहे. पण भारतीय कर्णधार अनिल चौधरी यांनी डीआरएसच्या बाबतीत धोनी अचूकतेच्या फार जवळ असतो, पण तो नेहमीच बरोबर असतो असं नाही असं त्यांनी सांगितलं आहे. 

"धोनी नेहमीच योग्य असतो असं काही नाही. अनेकदा गोष्टी वेगळ्या पद्धतीने असतात. तो अचूकतेच्या फार जवळ असतो. त्याच्याकडे खेळासंबंधी अनेक आयडिय आहेत," असं भारतीय अम्पायर अमिल चौधरी यांनी शुभांकर मिश्रा यांना युट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना सांगितलं.

अनिल चौधरी यांनी यावेळी भारताचा तरुण खेळाडू ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विकेटकिपर म्हणून त्याने चांगली प्रगती केली असल्याचं म्हटलं आहे. "ऋषभ पंत गेल्या काही दिवसांमध्ये चांगली प्रगती करत आहे. हा सर्व अनुभवाचा खेळ आहे. तुम्ही रिप्ले पहा आणि नंतर तुमच्या कॉलचे पुनर्मूल्यांकन करा", असं ते म्हणाले आहेत. 

"विकेटकीपरला चेंडूवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा मिळालेली असते. ते स्थिर असतात आणि चेंडूनुसार हालचाली करतात. खरंतर, कधीकधी सर्वोत्तम पंचांचे निर्णय यष्टीरक्षकांच्या हालचालीवर आधारित असतात कारण ते चेंडूचे अनुसरण करतात," असं त्यांनी सांगितलं 

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धोनीवर भाष्य करताना जर त्याची मैदानात सात तास घालवण्याची तयारी असेल तर तो एक उत्तम अम्पायर होऊ शकतो असं म्हटलं आहे. "धोनी अचूकतेच्या जवळ आहे. अनेकदा तो इतरांना अपील करण्यापासून थांबवतो. तो एक चांगला कर्णधार होऊ शकतो. फक्त त्याची मैदानात सात तास घालवण्याची तयारी असावी," असं त्याने सांगितलं.