Doping Test | पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर डोपिंगप्रकरणी 4 वर्षांची बंदी

खेळाडू ताकद वाढवण्यासाठी किंवा दमदार कामगिरी करण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात. 

Updated: Jun 28, 2021, 05:44 PM IST
Doping Test | पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर डोपिंगप्रकरणी 4 वर्षांची बंदी title=

मुंबई : टीम इंडिया  (Indian Cricket Team)  आता श्रीलंका विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान याआधी पृथ्वी शॉनंतर (Prithvi Shaw) आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर डोपिंग प्रकरणी  (Doping Case)  4 वर्षांची बंदी टाकण्यात आली आहे. नाडाने (National Anti Doping Agency) ही कारवाई केली आहे. (Indian women cricketer anshula rao failed in doping test banned for 4 years)

 नाडाने मध्य प्रदेशकडून (Madhya Pradesh Women Cricket Team) खेळणारी अष्टपैलू महिला क्रिकेटपटू अंशुला राववर (Anshula Rao) ही कारवाई केली आहे. अंशुला डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह सापडली. अंशुला डोपिंग टेस्ट प्रकरणी कारवाई होणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. अंशुलाने बीसीसीआयने आयोजित केलेल्या 23 वर्षाखालील स्पर्धेत मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं होतं. 

दरम्यान अंशुलावर कारवाई करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अंशुलावर (Steroid 19 Norandrosterone) च्या सेवनाप्रकरणी दोषी आढळली होती. अंशुलाला 14 मार्च 2020 मध्ये उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती. 

अंशुलाला तिने घेतलेल्या प्रतिबंधत पदार्थाच्या सेवनाबाबतचं योग्य कारण सांगू शकलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्यानुसार, अंशुलाचे दोन नमुने बेल्जियममधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अँटी-डोपिंगच्या पॅनेलनुसार, अंशुलाने हे औषध जाणीवपूर्वक घेतलंय. अँटी-डोपिंग पॅनेलचे गौरंग कांतनुसार, आपल्या शरीराची देखभाल करणे आणि कोणत्याही प्रकारच्या बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन न करणे ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे.

डोपिंग टेस्टबाबत थोडक्यात

नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला स्पर्धेदरम्यान किंवा इतर वेळेस उत्तेजक पदार्थांचे सेवन करता येत नाही. खेळाडू ताकद वाढवण्यासाठी किंवा दमदार कामगिरी करण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात. खेळाडूने उत्तेजक पदार्थ घेतलेत का, हे जाणून घेण्यासाठी स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणी केली जाते. ही डोपिंग टेस्ट कधीही केली जाते. या टेस्टसाठी यूरिन सॅम्पल घेतले जाते. ही टेस्ट नाडा (National Anti-Doping Agency) किंवा (World Anti-Doping Agency) द्वारे केली जाते.

संबंधित बातम्या :

त्या चुकीसाठी मी आणि माझे बाबा जबाबदार, 'या' भारतीय क्रिकेटरचा खुलासा