कोरोनाचा BCCIला असाही फटका, आणखी एक मोठी स्पर्धा गेली हातून

कोरोनाचा फटका सर्वसामन्यांप्रमाणे क्रीडा विश्वालाही मोठा बसला आहे.

Updated: Jun 28, 2021, 05:05 PM IST
कोरोनाचा BCCIला असाही फटका, आणखी एक मोठी स्पर्धा गेली हातून title=

मुंबई: कोरोनाचा फटका सर्वसामन्यांप्रमाणे क्रीडा विश्वालाही मोठा बसला आहे. बीसीसीआयचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधी बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यामुळे 4 मे रोजी आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. त्यानंतर हे सामने UAEमध्ये घेण्याचं नियोजन करण्यात आलं मात्र टी 20 सामने आणि आयपीएल याच्या वेळेतील गणितात ताळमेळ न बसवता आल्यानं मोठा गोंधळ झाला. BCCIच्या हातून आणखी एक मोठी स्पर्धा गेली आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर IPL पाठोपाठ टी 20 वर्ल्ड कपही भारता बाहेर खेळवण्याचा मोठा निर्णय झाला. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप बीसीसीआयच्या हातून गेलं आहे. बीसीसीआयने IPL आणि टी 20 वर्ल्ड कपमधील वेळेचा ताळमेळ बसवण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र दिलेल्या वेळेत ते काम पूर्ण न झाल्यानं अखेर आयसीसीने निर्णय घेतला.

IPL पाठोपाठ आता टी 20 वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAEमध्ये खेळवले जाणार असल्याची माहिती BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.

सौरव गांगुली यांनी आयसीसीला सांगितलं की टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAEमध्ये खेळवले जातील. यासंदर्भातील नियोजन बीसीसीआय सध्य़ा करत आहे. 12 सामने तीन शहरात खेळवण्याचा विचार आहे. आयसीसीने बीसीसीआयला 1 महिन्याचा अवधी दिला होता. तो पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय समोर आला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर खेळाडूचा लाजीरवाणा पराक्रम, व्हिडीओ उडवली खळबळ

कसं असू शकतं शेड्युल?

पहिल्या टप्प्यात 8 टीममध्ये 12 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 4 (प्रत्येक ग्रूपमधून 2) असे सामने खेळवल्यानंतर सुपर 12 साठी टीम क्वालिफाइड केल्या जाणार आहेत. या टीम बांग्लादेश, श्रीलंका, आयरलँड, नीदरलँड, स्कॉटलँड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी या टीम रँकिंग 8 टीम विरुद्ध सामने खेळून सुपर 12 पर्यंत पोहोचणार आहेत. 

ISSF World Cup मध्ये मराठमोळ्या राही सरनोबतची सुवर्ण कमाई

सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून हे सामने सुरू होतील. यामध्ये 6-6 अशी दोन ग्रूपमध्ये विभागणी असेल. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह इथे खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 3 नॉकआउट सामने होणार आहेत. दोन सेमीफायनल आणि एक फायनल असा संपूर्ण शेड्युल असणार आहे.