India's T20 WC Squad : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (America) यंदाचा टी20 वर्ल्ड कप खेळवला जाईल. या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वात भारतीय निवड समितीची बैठक होत आहे. अशातच आता या महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया (India’s T20 World Cup Selection) जाहीर होईल. अशातच आता टीम इंडियाच्या संभाव्य खेळाडूंची यादी समोर आली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळणार आहे.
आयसीसीने सर्व 20 देशाच्या संघांना 1 मे पर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस बीसीसीआयला देखील संघ जाहीर करावा लागणार आहे. अशातच आता सध्याच्या आयपीएलमधील प्रदर्शनावरून बीसीसीआयने काही खेळाडूंना संधी दिल्याची माहिती मिळतीये. त्यानुसार, विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग या फलंदाजांना संधी दिली गेली आहे. तर केएल राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत या विकेटकिपर फलंदाजांना देखील स्कॉडमध्ये संधी दिली जाऊ शकते.
त्याचबरोबर हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे या पाच ऑलराऊंडर्ससह टीम इंडिया मैदानात उतरू शकते. तसेच कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई या फिरकीपटूंवर टीम इंडियाची मदार असेल. एवढंच नाही तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप अर्शदीप आणि आवेश खान यांच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, टीम इंडियासाठी खेळणारे काही खेळाडू असे आहेत ज्यांची आयपीएल 2024 मधील कामगिरी चांगली नाही. यामुळे त्यांना विश्वचषकापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये बीसीसीआयच्या कॅन्ट्रॅक्टमधून बाहेर पडलेला इशान किशन देखील आहे. तसेच आर आश्विन, श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांचा देखील समावेश आहे.
कसा असेल टीम इंडियाचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (C), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप अर्शदीप आणि आवेश खान.