नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने २-०ने सीरिज आपल्या खिशात घातली आहे.
टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली श्रीलंकेच्या टीमला केवळ १७२ रन्स करता आले. त्यामुळे टीम इंडियाने ही मॅच ८८ रन्सने जिंकली आहे.
टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल याने सर्वाधिक म्हणजेच ४ विकेट्स घेतले. त्यानंतर कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतले तर, जयदेव उनाडकट याने एक विकेट घेतला.
श्रीलंकन टीमकडून परेराने सर्वाधिक ७७ रन्स केले. तर, थारंगाने ४७ रन्सची इनिंग खेळली. या व्यतिरिक्त इतर कुठल्याच बॅट्समनला चांगला स्कोर करता आला नाही.
इंदूरमधील होळकर स्टेडिअममध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात खेळताना ११ फोर आणि ८ सिक्सर लगावत सेंच्युरी केली. रोहितने अँजिलो मॅथ्युज याच्या बॉलवर फोर लगावत डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा ने ३५ बॉल्समध्ये धडाकेबाज इनिंग खेळत सेंच्युरी लगावली.
टीम इंडियाकडून रोहित शर्माने ४३ बॉल्समध्ये ११८ रन्स केले ज्यामध्ये १२ फोर आणि १० सिक्सरचा समावेश आहे. केएल राहुलने ४९ बॉल्समध्ये ८९ रन्स केले. धोनीने २८ रन्स तर हार्दिक पांड्याने १० रन्स केले.