IndvsNz women : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेटने पराभव

 न्यूझीलंडसाठी सुझी बेट्सने आणि एमी सेटरवेट ने अर्धशतकी खेळी केली.

Updated: Feb 1, 2019, 04:54 PM IST
IndvsNz women : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेटने पराभव    title=

हेमिल्टन : पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या किवींनी तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत भारताचा पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटने पराभव केला. या सामन्यात  विजय मिळवून न्यूझीलंडचा ३-० असा पराभव करण्याची संधी भारताकडे होती. पण ही संधी भारताने गमावली. असे झाले असते तर हा एक विक्रम ठरला असता. 

न्यूझीलंडला भारताने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचे आव्हान न्यूझीलंडने अवघ्या 29.2 ओव्हरमध्ये पार केले. न्यूझीलंडने 2 बाद 153 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 2 विकेट गमावल्या. न्यूझीलंडसाठी सुझी बेट्सने 57 तर कर्णधार एमी सेटरवेट नाबाद 66 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीने न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. 

 

न्यूझीलंडची पहिली विकेट 22 धावांवर गेली. लॉरेन डोन 10 रन करुन रनआऊट झाली. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी सुझी बेट्स आणि एमी सेटरवेट यांच्यात 84 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची दुसरी विकेट 106 धावांवर गेली. सुझी बेट्स 57 धावांवर बाद झाली. यानंतर तिसऱ्या विकेटसाठी विजयी भागीदारी झाली. एमी सेटरवेट आणि सोफी डेविन या जोडीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी  47 धावांची विजयी भागीदारी केली. भारताकडून एक विकेट ही पुनम यादवने घेतली.

याआधी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. भारताचा पहिला विकेट 12 धावांवर गेला.  स्मृती मानधना अवघी 1 धाव करुन बाद झाली. यानंतर भारतीय संघाचे नियमित अंतराने विकटे जात राहिले. भारताकडून सर्वाधिक तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. भारताच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आली नाही. भारताकडून  सर्वाधिक 52 धावा या दिप्ती शर्माने केल्या. तर त्याखालोखाल हरमिनप्रीत कौर आणि  दयालन हेमलता यांनी प्रत्येकी 24 आणि 13 धावा केल्या.

न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर दिप्ती शर्माचा अपवाद वगळता कोणत्याच फलंदाजाला जास्त वेळ टिकता आले नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक  4 विकेट्स या अन्ना पीटरसनने घेतल्या. ली तहुहुने 3 तर एमेलिया केरने 2 आणि लेघ कास्पेरेकने 1 विकेट घेतला.