मुंबई : दोन वर्षांच्या बॅननंतर आयापीएलमध्ये चैन्नई सुपरकिंग पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करण्यासाठी तयार झाले आहे. 7 एप्रिल 2018 पासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. त्यासाठी सारेच संघ कंबर कसून तयारी करत आहे.
चैन्नई सुपरकिंग संघातील खेळाडू प्रॅक्टिससोबतच एका खास अॅडच्या शूटिंग आणि प्रमोशनच्या कामामध्येही व्यस्त आहेत. एका गाण्यावर थिरकताना चैन्नई सुपरकिंगच्या काही खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह, रवींद्र जड़ेजा, मुरली विजय, ड्वेन ब्रावो यांच्यासह अन्य खेळाडूदेखील डान्स करताना दिसत आहे.
चैन्नई सुपर किंग संघांची नवी जर्सी लॉन्च करण्यात आली आहे. नव्या जर्सीवर टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'चा लोगो दिसणार नाही. आता मुथ्थुट फायनान्सचा लोगो दिसणार आहे.
7 एप्रिलपासून यंदा आयपीएल च्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. पहिला सामना चैन्नई सुपरकिंग आणि मुंबई इंडियन्सच्या विरोधात रंगणार आहे.