IPL मॅचेसच्या कार्यक्रमात मोठा बदल, विराट समोर नवी समस्या

आयपीएल ११ लवकरच सुरु होणार असून क्रीडाप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, क्रीडाप्रेमींसाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम आयपीएलच्या ११व्या सीजनवर झाला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Sunil Desale Updated: Mar 29, 2018, 09:57 PM IST
IPL मॅचेसच्या कार्यक्रमात मोठा बदल, विराट समोर नवी समस्या title=
File Photo

नवी दिल्ली : आयपीएल ११ लवकरच सुरु होणार असून क्रीडाप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, क्रीडाप्रेमींसाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम आयपीएलच्या ११व्या सीजनवर झाला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

बीसीसीआयने दिली माहिती

आगामी कर्नाटक निवडणुकांमुळे आयपीएल ११मधील दोन टीम्सच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. याची माहिती भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयने) दिली आहे.

मॅचच्या कार्यक्रमात बदल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात होणाऱ्या मॅचच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.

...म्हणून कार्यक्रमात करण्यात आला बदल

आयपीएल ११ मध्ये खेळण्यात येणाऱ्या मॅचेसचं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे यामध्ये बदल करण्यात आला.

१२ मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आयपीएल मॅचेस दरम्यान सुरक्षा पुरवण्यात अडचण येऊ शकते. म्हणून १२ मे रोजी बंगळुरुमध्ये खेळण्यात येणारी मॅच फिरोजशाह कोटला स्टेडिअममध्ये शिफ्ट करण्यात आली आहे.

यासोबतच २१ एप्रिल रोजी दिल्लीत खेळली जाणारी मॅछ आता बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळण्यात येणार आहे. हा बदल आरसीबीचे कॅप्टन विराट कोहली याच्यासाठी एक अडचण निर्माण करु शकतो. कारण, या मैदानावर चांगलं प्रदर्शन करण्याचा रेकॉर्ड आहे.

आयपीएलच्या ११व्या सीजनची सुरुवात ७ एप्रिलपासून होणार आहे. पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. ही मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये खेळली जाणार आहे.