IPL 2019 : उथप्पाच्या संथ खेळीचा मुंबईला फायदा, विजयासाठी १३४ रनचं आव्हान

मुंबईकडून सर्वाधिक ३ विकेट मलिंगाने घेतल्या.

Updated: May 5, 2019, 09:59 PM IST
IPL 2019 : उथप्पाच्या संथ खेळीचा मुंबईला फायदा, विजयासाठी १३४ रनचं आव्हान title=

मुंबई : कोलकाताने मुंबईला विजयासाठी १३४ रनचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १३३ रन केल्या. कोलकाताकडून सर्वाधिक क्रिस लिनने ४१ रन केल्या. तर रॉबिन उथप्पाने ४७ बॉलमध्ये ४० रन केल्या. यातील २५ बॉलमध्ये उथप्पाला एकही रन काढता आली नाही.

 

पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलतकाताची आश्वासक सुरुवात झाली. शुभमन गिल आणि क्रिस लिनने पहिल्या विकेटसाठी ४९ रन जोडल्या. ७व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शुभमन गिल आऊट झाला. त्याने ९ रन केल्या. मुंबई विरुद्धच्या मागील मॅचमध्ये गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली. 

गिल बाद झाल्यानंतर काहीच वेळात कोलकाताने दुसरी विकेट गमावली. क्रिस लिन ४१ रन करुन आऊट झाला. त्याला हार्दिक पांड्याने आऊट केले.

ओपनर जोडी माघारी परतल्यानंतर मैदानात उथप्पा आणि कॅप्टन दिनेश कार्तिक खेळत होते. कार्तिकला विशेष काही करता आले नाही. कार्तिक ३ रनवर असताना मलिंगाने आपल्याच बॉलिंगवर कॅचआऊट केले. 

कार्तिक नंतर कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल मैदानात आला. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात स्फोटक खेळी करणारा रसेल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याला मलिंगाने आऊट केले. मुंबई विरुद्धच्या २८ मे ला झालेल्या मॅचमध्ये रसेलने ४० बॉलमध्ये ८० रनची तुफानी खेळी केली होती. रसेलनंतर कोलकाताने झटपट विकेट गमावल्या.

मुंबईकडून सर्वाधिक ३ विकेट मलिंगाने घेतल्या. तर हार्दिकने आणि बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा