IPL 2019: पंजाबच्या विजयामुळे मुंबईचं नुकसान

आयपीएलचा १२वा मोसम आता मध्याच्या जवळ आला आहे.

Updated: Apr 9, 2019, 05:04 PM IST
IPL 2019: पंजाबच्या विजयामुळे मुंबईचं नुकसान title=

मुंबई : आयपीएलचा १२वा मोसम आता मध्याच्या जवळ आला आहे. यामुळे आता सगळ्या टीममधली स्पर्धा वाढली आहे. बंगळुरू आणि राजस्थान वगळता इतर टीममध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. बंगळुरूला आत्तापर्यंतच्या ६ पैकी एकाही मॅचमध्ये विजय मिळालेला नाही. तर राजस्थानने ५ पैकी २ मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर कोलकाता, चेन्नई आणि पंजाब या टीमचे ८ पॉईंट आहेत. तर हैदराबाद मुंबई आणि दिल्लीचे ६ पॉईंट्स आहेत.

काल हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा विजय झाला. या विजयामुळे पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पंजाबच्या या विजयामुळे मुंबई आणि हैदराबादचं मात्र नुकसान झालं आहे. चौथ्या क्रमांकावर असलेली मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणारी हैदराबाद चौथ्या क्रमांकावर गेली आहे.

मुंबईचा पुढचा सामना बुधवारी पंजाबविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून पुन्हा टॉप-४ मध्ये जायची संधी मुंबईच्या टीमला आहे. मुंबईचा आत्तापर्यंत ५ पैकी ३ मॅचमध्ये विजय झाला आहे. तर २ सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला.