IPL 2019 क्वालिफायर-2 | चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

हा सामना एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

Updated: May 10, 2019, 07:32 PM IST
IPL 2019 क्वालिफायर-2 | चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय title=

विशाखापट्टणम : दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात क्वालिफायर-२ चा सामना खेळण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.  दिल्लीने आजच्या सामन्यासाठी टीममध्ये कोणताच बदल केला नाही. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईने केवळ टीममध्ये १ बदल केला आहे. टीममध्ये  मुरली विजय ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

 

लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा 

 

आजचा क्वालिफायर-२ चा सामना जिंकणारी टीम १२ तारखेला मुंबई सोबत अंतिम सामना खेळेल.चेन्नई- दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण २० सामने खेळले आहेत. त्यापैकी १४ सामन्यात चेन्नई तर ६ सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे.

दिल्ली अनेक वर्षानंतर प्ले-ऑफमध्ये पोहचली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारण्याचा प्रयत्न दिल्लीचा असेल. तर चेन्नईला प्ले-ऑफमधील मॅछ खेळण्याचा सर्वात जास्त अनुभव आहे. चेन्नईने याआधी एकूण ७ वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद चेन्नईने आपल्या नावे केले आहे.

प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला. परंतु अंकतालिकेत चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे चेन्नईला दिल्ली विरुद्ध मॅच जिंकून अंतिम सामन्यात पोहचण्यासाठीची  दुसरी संधी आहे.

दिल्लीच्या तुलनेत चेन्नईची टीम फार अनुभवी आहे. चेन्नईच्या बॅटिंगची जबाबदारी ही कॅप्टन धोनी आणि शेन वॉटसनच्या खांद्यावर असेल. तर बॉलिंगची जबाबदारी ही हरभजन सिंग, रविंद्र जडेजा आणि इमरान ताहिर या तिकडीवर असणार आहे.

दिल्लीच्या टीममध्ये युवा-अनुभवी खेळाडू आहेत. दिल्लीकडून शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांने यंदाच्या पर्वात ५०० पेक्षा अधिक अधिक रन केल्या आहेत. तर पृथ्वी शॉ,  ऋषभ पंत आणि कॅप्टन श्रेयस अय्यर देखील चांगली कामगिरी करत आहेत. दिल्लीच्या बॉलिगंची जबाबदारी इशांत शर्मा,  ट्रेंट बोल्ट, किमो पॉल आणि अमित मिश्रा यांच्यावर असेल. 

याच मैदानावर एलिमिनेटरचा सामना खेळण्यात आला होता. त्यामुळे या मैदानावर कशा प्रकारे खेळायचे याचा दिल्लीला अनुभव असेल. त्यामुळे दिल्लीच्या खेळाकडे लक्ष असणार आहे.

चेन्नई : फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, हरभजन सिंह,  इमरान ताहिर.   

दिल्ली : श्रेयस अय्यर (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, कॉलिन मुनरो, शेरफेन रुदरफोर्ड, अक्षर पटेल, कीमो पॉल, संदीप लामिछाने, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा.