IPL 2019: ...म्हणून घरच्या मैदानात मॅच असूनही धोनीने टॉस उडवला नाही

आयपीएल २०१९ च्या पहिल्या प्ले ऑफच्या सामन्यामध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Updated: May 7, 2019, 08:31 PM IST
IPL 2019: ...म्हणून घरच्या मैदानात मॅच असूनही धोनीने टॉस उडवला नाही title=

चेन्नई : आयपीएल २०१९ च्या पहिल्या प्ले ऑफच्या सामन्यामध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ही मॅच चेन्नईचं घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ही मॅच सुरु होण्याआधी टॉससाठी दोन्ही कर्णधार मैदानात आले. पण टॉस दरम्यान यावेळी नेहमीपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. धोनीने टॉस न उडवता रोहित शर्माने टॉस उडवला. प्रामुख्याने ज्या टीमच्या घरच्या मैदानात मॅच खेळली जाते त्या टीमचा कर्णधार टॉस उडवतो. मग धोनीने टॉस का उडवला नाही, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु झाली.

म्हणून रोहितने टॉस उडवला

घरच्या मैदानातला कर्णधार नेहमी टॉस उडवत असला, तरी ही मॅच प्ले-ऑफची आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांसाठीचा नियम वेगळा आहे. प्ले ऑफपासून पॉइंट्स टेबलमध्ये जी टीम वरच्या क्रमांकावर असेल, त्या टीमच्या कर्णधाराला टॉस उडवण्याची संधी मिळते. 

मुंबई-कोलकाता यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या मॅचमध्ये मुंबईने कोलकाताचा पराभव केला. या विजयासह मुंबई १८ पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर पोहचली. चेन्नई आणि दिल्लीचे देखील १८ पॉईंट्स होते. परंतु मुंबईचा नेट रनरेट हा या दोन्ही टीमच्या तुलनेत चांगला होता. त्यामुळे मुंबईची पहिल्या क्रमांकावर वर्णी लागली.

दरम्यान पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या टीमला फायनल मध्ये पोहचण्यासाठी २ वेळेस संधी मिळते. त्यामुळे मुंबई-चेन्नई यांच्यातून पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमीनेटर सामना जिंकणाऱ्या टीमसोबत प्ले-ऑफमध्ये पराभूत झालेली टीम खेळेल. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यामध्ये एलिमीनेटरचा सामना बुधवारी रंगणार आहे.