IPL 2020 : आज धोनी आणि कोहली आमने-सामने

आज बंगळुरु आणि चेन्नई यांच्यात रंगणार सामना...

Updated: Oct 10, 2020, 05:22 PM IST
IPL 2020 : आज धोनी आणि कोहली आमने-सामने title=

दुबई : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. कोहलीचा सामना धोनीच्या संघातील दिगज्ज खेळाडूंशी होणार आहे. 

कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या केदार जाधवच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात घेतलं जावू शकतं. विजयाच्या जवळ येवूनही चेन्नईला दहा धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर जाधवच्या खेळीवर टीका होऊ लागली. जाधवच्या जागी रितुराज गायकवाड किंवा एन जगदीशन यांना टीममध्ये घेतले जाऊ शकते. ज्यांना 2018 पासून संधी मिळाली नाही.

शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसीची सातत्यपूर्ण कामगिरी असूनही चेन्नईची मधली संघासाठी चिंतेचं कारण आहे. स्वत: कर्णधार धोनी ज्या फॉर्मसाठी ओळखला जात आहे त्यामध्ये तो दिसत नाहीये.

केकेआर विरूद्ध मागील सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली. अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने विकेट घेतले. पीयूष चावलाच्या जागी कर्ण शर्मा याने गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजी दीपक चहर, सॅम कुरन आणि शार्दुल ठाकूरवर अवलंबून असेल.

दुसरीकडे आरसीबीकडे कोहलीसारखा कर्णधार आहे. युवा देवदत्त पडीक्कल आणि अनुभवी एबी डिव्हिलियर्स सारखे चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. अ‍ॅरॉन फिंचकडूनही आक्रमक खेळीची अपेक्षा आहे.

गोलंदाजीत लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता कोणीही प्रभावी ठरलेले नाहीत. उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी हे महागडे सिद्ध झाले. श्रीलंकेच्या इसुरू उडाना आगमनाने गोलंदाजीला बळ मिळू शकेल.