मुंबई : आयपीएल सीझन १३ ला आजपासून सुरुवात झाली असून यातील पहिला सामना विजेते मुंबई इंडीयन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगतोय. कर्णधार रोहीत शर्माच्या ओपनिंगने मुंबई इंडीयन्सची सुरुवात चांगली झाली पण चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या विकेट पडत गेल्या. २० ओव्हर अखेर मुंबई इंडीयन्सने चेन्नई सुपर किंग्ज समोर १६३ चे आव्हान उभे केले आहे.
कर्णधार रोहीत शर्मा १२ धावांवर आऊट झाल्यावर मागोमाग विकेट पडण्यास सुरुवात झाली. मुंबई इंडीयन्समध्ये सौरव तिवारीने सर्वाधिक ४२ रन्स केले. तर सीएसकेच्या लुंगी निर्डीने सर्वाधिक ३ विेकेट घेतले. दुसरीकडे रविंद्र जडेजा आणि दीपक चहरने २-२ विकेट घेतले. डेथ ओव्हरमध्ये मुंबई इंडीयन्सला मोठा झटका बसला. किरन पोलार्ड १८ रन्सवर आऊट झाला. फास्ट बॉलर निग्डीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाचवा विकेट हार्दीक पांड्याच्या रुपात गेला. रविंद्र जडेजाने पांड्याला आऊट केले. फेफ डु प्लेसिसने छान झेल घेत तिवारीला ४३ आणि पांड्याला १४ रन्सवर माघारी पाठवले.