Virat Kohli | रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विराट (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL) इतिहासात असा कारनामा करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.

Updated: Sep 20, 2021, 07:36 PM IST
Virat Kohli | रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यामधील 31 वा सामन्याचे शेख झायेद स्टेडियममध्ये (Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi) आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात कोलकाता (KKR) विरुद्ध बंगळुरु (RCB) आमनेसामने असणार आहेत. बंगळुरुने टॉस जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट टॉससाठी मैदानात येताच त्याने पराक्रम केला आहे. विराट आयपीएलच्या इतिहासात असा कारनामा करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे. (ipl 2021 31st  Match kkr vs rcb captain virat kohli become 1st player who played 200 matches for a single team)

विराटने नेमकं काय केलंय?

कोलकाता विरुद्धचा हा सामना विराटच्या आयपीएल कारकिर्दीकतील 200 वा सामना ठरला आहे. विशेष म्हणजे विराटने हे 200 सामन्यात एकाच संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.आतापर्यंत विराटचा अपवाद वगळता 4 खेळाडूंनी 200 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.

मात्र विराट आयपीएलमध्ये एकाच संघाकडून 200 सामने खेळण्याचा पराक्रम करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्यामुळे विराटचा या विशेष सामन्यात चमकदार कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देण्याचा मानस असेल. 

विराटला 10 हजार धावांसाठी  71 धावांची आवश्यकता 

विराटला हा 200 वा सामना अविस्मरणीय करण्याची आणखी एक संधी आहे. विराट एकूण टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यापासून 71 धावा दूर आहे. विराटच्या नावे टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 311 सामन्यात 9 हजार 929 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.