आई शप्पत! या खेळाडूची स्टाईल पाहूनच IPLच्या लोगो आयडिया तर नाही सुचली?

या खेळाडूची स्टाईल पाहूनच IPLचा लोग तयार तर नसेल केला?

Updated: Apr 10, 2021, 12:56 PM IST
आई शप्पत! या खेळाडूची स्टाईल पाहूनच IPLच्या लोगो आयडिया तर नाही सुचली? title=

मुंबई: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं कमालीची कामगिरी केली आहे. 2 विकेट्सने RCB संघ जिंकला आहे. ग्लॅन मॅक्सवेल सोबतच एबी डिविलियर्सची चर्चा आहे. त्यानं अद्भुत रेकॉर्ड केला.एबी डिविलियर्सने 15 षटकार आणि 17 चौकार ठोकले आहेत. 

एबी डिविलियर्सच्या या अद्भुत रेकॉर्ड सोबत त्याच्या खेळण्याच्या स्टाइलची देखील चर्चा आहे. विरेंद्र सेहवाग यांनी एबी डिविलियर्सचं कौतुक केलं आहे. सगळ्या चेंडूवर तो खेळू शकतो आणि त्याच्या स्टाईलचं कराव तेवढं कौतुक थोडं आहे. 

 

विरेंद्र सेहवाग यांनी यासोबतच एक वेगळी बाजू देखील जगासमोर आणली आहे. ते म्हणतात की कदाचित एबी डिविलियर्सच्या या अनोख्या स्टाइलवरून IPLचा लोगो तयार तर नाही केला? त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मात्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. IPLचा लोगो आणि डिविलियर्सची स्टाईल यात खूप सामन्य असल्याचंही पाहायला मिळतं.