चेन्नई : सनराइजर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यात झालेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) च्या बंगळुरु संघाने बाजी मारली आहे. आरसीबीचा हा यंदाच्या सीजनमधला दुसरा विजय आहे.
150 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनराइजर्स हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत फक्त 143 रनच करता आले. ऑरेंज आर्मीकडून डेविड वॉर्नरने सर्वाधिक 54 रन केले. तर मनीष पांडेने 38 रनची खेळी केली.
हैदराबाद पुढे 150 रनचं टार्गेट
आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 149 रन केले होते. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 41 बॉलमध्ये 59 रन केले. या दरम्यान त्याने 5 फोर आणि 3 सिक्स देखील ठोकले. विराट कोहलीने 33, शहबाज अहमदने 14 आणि काइल जेमीसनने 12 रन केले.
हैदराबादने टॉस जिंकल्यानंतर आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) चा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) च्या संघाला आरसीबी (RCB)वर विजय मिळवण्यात अपयश आलं. विराट कोहली (Virat Kohli) च्या संघाने हा सामना 6 रनने जिंकला आहे.