दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना क्वारंटाइन होण्याचे BCCIचे आदेश

पुढील सूचना येईपर्यंत बीसीसीआयने दिल्ली कॅपिटलमधील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना स्वत: ला क्वारंटाइन करावं असे निर्देश दिले आहेत. 

Updated: May 4, 2021, 12:22 PM IST
दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना क्वारंटाइन होण्याचे BCCIचे आदेश

मुंबई: IPLच्या 14 व्या हंगामात कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाता संघातील खेळाडू वरूण चक्रवर्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या पाठोपाठ CSKवरही कोरोनाचं संकट आहे. 7 मे रोजी राजस्थान संघासोबत होणारा सामना स्थगित करण्याची मागणी केली आहे. त्या पाठोपाठ आता दिल्ली कॅपिटल्स संघाला क्वारंटाइन होण्याचे निर्देश बीसीसीआयने दिल्याची माहिती मिळाली आहे. 

वरूण चक्रवर्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ चेन्नई संघातील बॉलिंग कोचचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोच लक्ष्‍मीपति बालाजी आणि बस क्लिनरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावनं चेन्नई संघाचं देखील टेन्शन वाढलं आहे. 

पुढील सूचना येईपर्यंत बीसीसीआयने दिल्ली कॅपिटलमधील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना स्वत: ला क्वारंटाइन करावं असे निर्देश दिले आहेत. खरं तर केकेआरने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 29 एप्रिलला दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना झाला. कोलकाताच्या वरुण आणि संदीपच्या कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआय कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे दिल्ली संघाला क्वारंटाइनचे निर्देश दिले आहेत. 

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्या दरम्यान CSKचे बॉलिंग कोच मुंबई संघातील काही लोकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे नियमानुसार मुंबई संघातील खेळाडूंची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच सामना खेळवण्यात येणार आहे. या संदर्भात BCCI ने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही.