IPL 2021 आधी CSKच्या युवा खेळाडूंचा धमाल डान्स, टीम इंडियाचा गोलंदाज करतोय Missed

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमनं या चार युवा खेळाडूंचा डान्स इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Updated: Mar 20, 2021, 01:56 PM IST
IPL 2021 आधी CSKच्या युवा खेळाडूंचा धमाल डान्स, टीम इंडियाचा गोलंदाज करतोय Missed

मुंबई: एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 शेवटचा सामना आज होत आहे. त्यानंतर वन डे सीरिज पार पडणार आहे. त्यानंतर IPLची धूम आहे. या IPLसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. माहीचा संघ चेन्नई सुपर किंग्समधील खेळाडू देखील खूप उत्साहात आहेत. IPLच्या तयारी दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

धोनीचं नेतृत्त्व आणि डवेन ब्रावोची ताकद चेन्नई सुपर किंग्सकडे आहे. इतकंच नाही तर उमदे आणि नव्या दमाचे खेळाडू देखील असल्यानं यावेळी IPLची रंगत अधिक वाढणार आहे. CSKच्या सराव कॅम्पमध्ये खेळाडूंनी केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमनं या चार युवा खेळाडूंचा डान्स इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मास्टर सिनेमातील प्रसिद्ध म्युझिकवर साईं किशोर, ऋतुराज गायकवाड, एन जगदीशन, हरि निशांत डान्स करत आहेत.

वाथी कमिंग या गाण्यावर त्यांनी धरलेला ठेका पाहून टीम इंडियातील गोलंदाजानं त्यावर भावुक होत कमेंट केली आहे. वाथी कमिंग गाण्यावरचा डान्स पाहून गोलंदाज दीपक चाहरनं मी हे मीस करत असल्याची कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दुसरीकडे दीपक चाहर त्याच्या सध्याच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.