दुबई: कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएलचे सामने आजपासून सुरू होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात UAE इथे सामने सुरू होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स पहिला सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. यावेळी चेन्नई सुपकिंग्स फुल फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे हिटमॅन रोहितची टीम देखील चांगली कामगिरी करत आहे. आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी? कोण ठरणार वरचढ जाणून घेऊया हेड टू हेड रेकॉर्ड
CSK विरुद्ध MI हा सामना चाहत्यांसाठी फार उत्सुकता ताणून धरणारा असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 31 सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध आयपीएलमध्ये खेळले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचं पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 वेळा चेन्नईवर विजय मिळवला आहे. तर कॅप्टन कूल धोनीच्या टीमला आतापर्यंत केवळ 12 सामने जिंकण्यात यश आलं आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईने 6 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2021 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 10 गुण असून 7 पैकी 5 सामने जिंकलेत.
आयपीएल 2021चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला दुबईत खेळला जाणार आहे. तर पहिला क्वालिफायर 10 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. याशिवाय एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर अनुक्रमे 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
डिज्नी +हॉटस्टारचे वेगळे सबस्क्रिप्शन घेऊनही सामन्यांचा आनंद घेऊ शकता. डिज्नी + हॉटस्टार व्हीआईपी पॅक आहेत ज्यांची सदस्यता एकावर्षासाठी 399 रुपये आहे.