मुंबई: दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. श्रेयसला झालेल्या दुखापतीमुळे तो संपूर्ण IPL खेळू शकणार नाही. गुरुवारी त्याच्या खांद्यावर शस्रक्रिया होणार आहे. तर दुसरीकडे अक्षर पटेलला कोरोना झाल्यानं पहिले सामने तोही संघात खेळू शकणार नाही.
IPLच्या चौदाव्या हंगामाची 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. IPLआधी 4 दिग्गजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या IPLमधील विजयावर शंका उपस्थित केली आहे. त्यांचा विजयाचा मार्ग खडतर असून आतातरी त्यांना ट्रॉफी मिळेल असं वाटत नाही अशी भविष्यवाणी या 4 दिग्गजांनी केली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीर, डेल स्टेन, इयान बिशप आणि अजित आगरकर यांनी दिल्ली कॅपिटल्सबाबत भाकित केलं आहे. इयान बिशपने अगदी असे म्हटले की दिल्ली राजधानी दिल्ली या हंगामात प्लेऑफमध्ये पात्र होऊ शकणार नाही आणि पाचव्या स्थानावर जाईल. गौतम गंभीर, अजित आगरकर आणि डेल स्टेन म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल मात्र विजयापासून दूर राहिल.
पृथ्वी शॉ सर्वाधिक धावा करू शकतो असा कयास गौतम गंभीर यांनी व्यक्त केला आहे. तर इयान बिशप यांनी ऋषभच्या खांद्यावर नेतृत्व दिल्यानं त्याच्यावर एकप्रकारचा दबाव असणार आहे असं म्हटलं आहे. तर प्लेइंग इलेवनमध्ये 4 विदेशी खेळाडूंना संधी देण्यात यावी असं चारही दिग्गजांचं मत आहे.
आता दिल्ली कॅपिटल्सकडे ही संधी असणार आहे त्यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरू न देण्याची आणि दुसरं म्हणजे ऋषभवर दाखवलेला विश्वास प्रत्यक्षात मैदानात सिद्ध करून दाखवण्याची. 9 एप्रिलपासून IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे विशेषत: ऋषभ पंतकडे सर्वांच्या नजरा आहेत.