मुंबई : आयपीएलने (IPL 2021) या भारतीय क्रिकेट संघासाठी (Team India) अनेक खेळाडू दिले आहेत. फलंदाजांपासून गोलंदाजांपर्यंत आयपीएलने अनेक खेळाडू घडवले आहेत. भारताचा सध्याचा आघाडी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) हे देखील आयपीएलमधूनच भारतीय क्रिकेट संघाला सापडलेले प्रतिभावान खेळाडू आहेत.
यंदाच्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामातही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने दबदबा निर्माण केला आहे. यात आणखी एका खेळाडूचा उदय झाला आहे. आयपीएलच्या पदापर्णातच त्याच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याने केला आहे. या खेळाडूचं नाव आहे उमरान मलिक (Umran Malik). सनरायजर्स हैदराबादकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
काश्मीरचा हा युवा गोलंदाजाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपला पहिलाच सामना खेळला. या सामन्यात त्याच्या नावावर आयपीएल 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम जमा झाला. आपल्या पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू त्याने तब्बल 150.06 किमी प्रतिसाद वेगान टाकला. या हंगामातला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. यावेळी त्याच्यासमोर नाईट रायडर्सचा शुभमन गिल फलंदाजी करत होता.
मलिक या षटकात वेगाचा बादशाह ठरला. त्याने आपल्या पहिल्या षटकात 145, 141.5, 150, 147, 143, 141 किमी वेगाने चेंडू टाकले. उमरानला 4 षटकात एकही विकेट घेता आली नाही, पण त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं
याआधी हा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर होता. त्याने 147.68 किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला. यानंतर खलील अहमदने 147.38kph च्या वेगाने चेंडू टाकला. तर या यादीत पाचव्या क्रमांकावरही उमरान मलिकच आहे. मलिकने 146.84kph च्या वेगाने चेंडू टाकला.
आयपीएलच्या सर्व हंगामात सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम एनरिक नोर्खियाच्या नावावर आहे. नोर्खियाने तब्बल 156.22 किमी वेगाने चेंडू टाकला होता. याशिवाय 155.21 आणि 154.74 किमी या वेगाने त्याने गोलंदाजी केली आहे. यानंतर डेल स्टेनचं नाव आहे. डेल स्टेनने 154.40 वेगाने चेंडू टाकला होता.