IPL 2021 : राशिद खानसोबत या परदेशी खेळाडूंनी ठेवला रोजा ; म्हणाले- हे खूप कठीण आहे, मला भूक लागली, Video Viral

 रमजानच्या महिन्यातच यावर्षी आयपीएल (IPL 2021) चे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे काही खेळाडू उपवास ठेवण्या बरोबरच मॅच खेळत आहेत.

Updated: Apr 19, 2021, 08:31 PM IST
IPL 2021 : राशिद खानसोबत या परदेशी खेळाडूंनी ठेवला रोजा ; म्हणाले- हे खूप कठीण आहे, मला भूक लागली, Video Viral title=

मुंबई : रमजानच्या महिन्यातच यावर्षी आयपीएल (IPL 2021) चे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे काही खेळाडू उपवास ठेवण्या बरोबरच मॅच खेळत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने आपली एकता दाखवण्यासाठी लोकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. राशिद खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि अशी माहिती दिली की, संघातील उर्वरित मुस्लिम खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी संघातील स्टार खेळाडू देखील रमजानचा उपवास करत आहेत.  संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि केन विलियमसन (Kane Williamson) हे दोघे ही त्याच्या सोबत उपवास करत आहेत.

सनरायझर्स संघात राशिद व्यतिरिक्त मोहम्मद नबी, मुजीब फर रहमान आणि खलील अहमद रोजा करत आहेत. रविवारी या संघाचा कोणताही सामना नव्हता, म्हणून विल्यमसन आणि वॉर्नरने आपल्या सहकारी खेळाडूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

राशिदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो विलियमसन आणि वॉर्नरसोबत टेबलवर बसलेला दिसत आहे. जेव्हा त्याने वॉर्नरला रोजाबद्दल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की, "रोजा करणे खूप चांगली गोष्ट आहे, पण तो खूप कठीण आहे. मला खूप तहान आणि भूक लागली आहे." तर विल्यमसन म्हणाला की, त्याला चांगले वाटत आहे. यानंतर राशिदने चाहत्यांना सांगितले की, वॉर्नर आणि विल्यमसन यांनीही त्याच्याबरोबर रमजानचा उपवास केला आहे आणि याचा त्याला खूप आनंद झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे चाहते दोन्हीही परदेशी खेळाडूंचे जोरदार कौतुक करत आहेत.