IPL 2021 | खेळाडूंची एक चूक महागात, 'या' कारणामुळे बायो बबलमध्ये कोरोना शिरला

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 

Updated: May 22, 2021, 04:47 PM IST
IPL 2021 | खेळाडूंची एक चूक महागात, 'या' कारणामुळे बायो बबलमध्ये कोरोना शिरला title=

मुंबई : कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करावा लागला. बीसीसीआयने (BCCI) मोठ्या प्रमाणात खेळाडूंच्या सुऱक्षिततेची काळजी घेतली होती. खेळाडू बायो-बबलमध्ये होते. यानंतरही कोरोनाने बायो-बबल भेदला. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही खेळाडूंना कोरोना कसा झाला, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयपीएल सुरु होण्याआधी खेळाडूंनी लसीकरणासाठी नकार दिला होता. तर काही खेळाडूंनी याबाबत दुर्लक्ष केलं होतं. खेळाडूंमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता नव्हती. (IPL 2021 Many players refused to take Corona vaccine before the tournament)  

टीओआयला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, " 2 फ्रँचायजींनी आपल्या खेळाडूंना लस घेण्यासाठी तयार केलं होत. तर उर्वरित संघ मालकांना आपल्या खेळाडूंची मन वळवता आली नाहीत. लस घेतल्यानंतर आपल्या प्रकृतीत बिघाड होईल, अशी भिती खेळाडूंना होती. बायो बबलमध्ये असल्याने आपल्या काही होणार नाही. आपण सुरक्षित वातावरणात आहोत, त्यामुळे लस घेण्याची गरज नाही, असा समज खेळाडूंचा होता. यामुळे फ्रँचायजींनीही खेळाडूंना लसीकरणासाठी फार प्रवृत्त केलं नाही."   

सूत्राने म्हटलं की, "दुसऱ्या बाजूला परदेशी खेळाडू लस घेण्यासाठी इच्छूक होते. मात्र कायेदशीररित्या परदेशातील खेळाडूंना लस देणं योग्य नव्हतं. देशात कोरोनाचा हाहाकार होता. आयपीएलच्या सामन्यांचे एकूण 6 शहरात आयोजन केलं होतं. सामन्य़ाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खेळाडूंना चार्टर प्लेनने प्रवास करावा लागला. या चार्टर प्लेनमध्ये इतर कर्मचारीही होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत कोणाकडे काहीच माहिती नव्हती." 

कोरोनाबाधित खेळाडू

स्पर्धा स्थगित होऊन आता 2 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र त्यानंतरही काही खेळाडू हे पॉझिटिव्ह आहेत. सनरायजर्स हैदराबादचा विकेटकीपर फलंदाज रिद्धीमान साहाचा 2 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू प्रसिद्ध कृष्णाही बंगळुरुत आपल्या राहत्या घरी क्वारंटाईन आहे.

या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ मुंबईहून इंग्लंडला 2 जूनला रवाना होणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडू मुंबईत जमणार आहेत. मात्र मुंबईत येण्यासाठी प्रत्येक खेळाडूला 3 वेळा आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक आहे. या तिनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना मुंबईत प्रवेश असणार आहे. यामुळे रिद्धीमान आणि प्रसिद्धला यातून लवकर ठणठणीत व्हावे लागणार आहे.