डगआऊटमध्ये RCB च्या खेळाडूची करामत; Viral Photo पाहून नेटकरी हैराण

अजब फ्लर्टिंगची गजब गोष्ट...   

Updated: Sep 21, 2021, 10:16 AM IST
डगआऊटमध्ये  RCB च्या खेळाडूची करामत; Viral Photo पाहून नेटकरी हैराण
छाया सौजन्य - सोशल मीडिया

IPL 2021 :बंगळुरू (RCB) आणि कोलकाता या दोन्ही संघांमध्ये सोमवारी आयपीएल 2021 मधील सामना खेळवण्यात आला. यामध्ये आरसीबीला 9 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाताच्या संघानं विराटच्या बंगळुरू संघाला अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट केलं. यानंतर KKR नं RCB ला 9 गडी राखत चांगलीच धुळ चारली. 

तिथं खेळपट्टीवर संघ सामना हरत होता आणि इथं डगआऊटमध्ये मात्र वेगळाच सामना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर आरसीबीचा गोलंदाज काईल जेमीसन याचा एक फोटो बराच व्हायरल झाला. यामध्ये डगआऊटमध्य़े आरसीबीच्याच संघ व्यवस्थापनापैकीच एका तरुणीकडे पाहून काईल गालातल्या गालात हसताना दिसत आहे. बरं, तिथं संघातील इतर खेळाडूही असून, त्यांच्या चेहऱ्यावर सामना गमावण्याची भीती स्पष्टपणे दिसत आहे. पण, हा पठ्ठ्या मात्र भलत्याच दुनिय़ेत रमल्याचं दिसत आहे. 

काईल जेमीसनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक मीम्स व्हायरल झाले. हा फोटो ज्या क्षणी समोर आला तेव्हा आरसीबीची धावसंख्या 4 गडी बाद 54 इतकी होती. तिथं संघाची अवस्था बिकट असताना जेमीसनचा हा अंदाज म्हणजे आग लगे बस्ती मे... अशीच होती याच प्रतिक्रिया इंटरनेटवर पाहायला मिळाल्या.

आरसीबीच्या पराभवास कोण कारणीभूत? 
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. सोमवारी बंगळुरू संघाच्या फलंदाजीच्या फळीला त्यानं बराच गोंधळ घातल्याचं दिसून आलं. त्यानं 4 षटकांमध्ये 13 धावा देत तीन गडी बाद करण्याची कमाल करुन दाखवली. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर केकेआरनं बंगळुरूच्या संघाला 92 धावांवरच रोखलं. ज्यामुळं कोलकाता संघाला जोरदार विजय मिळवणं शक्य झालं.