मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर या दोन्ही टीम्स एकमेकांना भिडतील. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई चौथ्या तर पंजाब आठव्या स्थानी आहे. मुंबईनं 4 पैकी 2 लढती जिंकल्यात तर 2 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
पंजाब किंग्स संघानं एकच मॅच जिंकली असून 3 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या मॅचमध्ये मुंबईला दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर हैदराबादनं पंजाबचा धुव्वा उडवला होता. दोन्ही टीम्स आजच्या मॅचमध्ये थोडेफार बदल करण्याची शक्यता आहे.
.@Mozzie21 is putting in the hard yards #SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #PBKSvMI pic.twitter.com/6gS0rbdihF
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 23, 2021
पराभवाची मरगळ झटकून दोन्ही टीम्स आत्मविश्वासानं मैदानात उतरतील. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुका मुंबईला टाळाव्या लागतील. आतापर्यंत मुंबईच्या कामगिरीवर नजर टाकली तर मधल्या ओव्हर्समध्ये मुंबईचे प्लेअर्स संघर्ष करताना दिसत आहेत. चुकीचे शॉट्स मारुन आपली विकेट फेकताना दिसत आहेत. तसंच पंजाबलाही हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये केलेल्या चुकांनमधून शिकून नव्या जिद्दीनं मुंबईच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे.
Step by step Day by day Match by match
We march together #OneFamily #MumbaiIndians #KhelTakaTak #IPL2021 #PBKSvMI pic.twitter.com/Ye83a7HIhZ
— Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2021
मुंबईच्या ताफ्यात कॅप्टन रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन तसंच हार्दिक पांड्या कायरन पोलार्ड धावसंख्या उभारण्यात योगदान देऊ शकतात. मुंबईच्या बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टवर असेल. पंजाबच्या गोटातही मोठी खेळी करणारे खेळाडू आहेत. ख्रिस गेल आणि कॅप्टन लोकेश राहुलला झटपट बाद करण्यासाठी मुंबईला रणनीती आखावी लागेल.
पंजाबचा निकोलस पुरण अजून पाहिजे तशी लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतो. पंजाबचे बॉलर्सही संघर्ष करताना दिसत आहेत. मुंबईवर विजय मिळवायचा असेल तर पंजाबला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्स कशाप्रकारे एकमेकांचा मुकाबला करुन विजय मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.