मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद चेपॉक स्टेडियमवर सामना पार पडला. हिटमॅन रोहित शर्माच्या टीमने यावेळी जबरदस्त कामगिरी करत 13 धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी दरम्यान संघातील एका फलंदाजाने जबरदस्त षटकार ठोकला. IPL 2021च्या चौदाव्या हंगामातील हा सर्वात लांब ठोकलेला षटकार आहे.
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कीरोन पॉलार्डचा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदाच्या हंगामात त्याने सर्वात लांब षटकार ठोकल्यानं त्याचं कौतुक होत आहे. आतापर्यंत 99 किंवा 100 मीटर लांब षटकार ठोकले आहेत. मात्र कीरोन पोलार्डने 17 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर 105 मीटर लांब षटकार ठोकला.
IPL 2021 MI vs SRH: हिटमॅन रोहित शर्माने मोडला कॅप्टन कूलचा रेकॉर्ड
Pollards 105 meter long six pic.twitter.com/2IFA2Z7vNH
— राम पारीक (@Pull_Shot) April 17, 2021
Polly 105 M
WHAT. A. HIT #OneFamily #MumbaiIndians #MI #MIvSRH #IPL2021 @KieronPollard55 pic.twitter.com/gXwoQ30si2
— Mumbai Indians (@mipaltan) April 17, 2021
हे वाचा- IPL 2021: एका सिक्सनं फ्रिजची फुटली काच, थोडक्यात वाचले हैदराबादचे खेळाडू
यंदाच्या IPLमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्य़ात RCBचा स्टार फलंदाज ग्लॅन मॅक्सवेलनं 100 मीटर षटकार ठोकला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हा षटकार ठोकला होता. त्यानंतर सुर्यकुमार यादवने देखील स्टेडियमबाहेर कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 99 मीटर लांब षटकार ठोकला होता. या दोघांचे रेकॉर्ड मोडत पॉलार्डनं 105 मीटर लांब षटकार ठोकला आहे.