IPL 2021: पांड्या बंधूंची बायकोसोबत गार्डनमध्ये धमाल! कूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

Updated: Apr 19, 2021, 08:50 AM IST
IPL 2021: पांड्या बंधूंची बायकोसोबत गार्डनमध्ये धमाल! कूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: देशात IPL सामने रंगात आले आहेत. सामन्यांमधील चुरस वाढली असतानाच खेळाडू जसं मैदानात धमाल करतात तशीच मैदानाबाहेर देखील वेगवेगळ्या गमतीजमती किंवा आपण कसा वेळ घालवला हे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मुंबई इंडियन्स संघातील कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या रिकाम्या वेळेत काय करत आहेत हे त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकशिवाय त्यांची पत्नी नताशा भाऊ कृणाल पंड्या आणि पंखुडी शर्मा हॉटेलच्या बागेत डान्स करताना दिसत आहेत. पांड्या ब्रदर्सने नारंगी रंगाचे टी-शर्ट घातले आहेत. तर नताशा नेव्ही ब्लू आणि पंखुडीने स्काय ब्लू टॉपमध्ये डान्स करताना दिसत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krunal himanshu Pandya (@krunalpandya_official)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नताशा आणि कृणालने आपल्या इन्स्टावर त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.

मुंबई इंडियन्स संघाचा सामना उद्या दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे. चेपॉक स्टेडियमवर हा सामना होणार आहेय नुकताच काल दिल्ली संघाने पंजाबवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईत पॉईंट टेबलसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. उद्याचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.