IPL 2021: मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, नव्या रुपात दिसणार रोहित ब्रिगेड

IPL 2021 मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा लूक...

Updated: Mar 28, 2021, 03:02 PM IST
IPL 2021: मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, नव्या रुपात दिसणार रोहित ब्रिगेड title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने तयारी सुरु केली आहे. 5 वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियंस (Mumbai Indians) या सीजनमध्ये नव्या रुपात दिसणार आहे. यासाठी फ्रेंचायजीने जर्सीमध्ये बदल केले आहे.

मुंबई इंडियन्सची नवी जर्सी

आयपीएल 2021 साठी मुंबई इंडियन्सने आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. याबाबत फ्रेंचायजीने म्हटलं की, 'नवी जर्सीमध्ये 5 मूळ तत्व, त्वों पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश यांचा समावेश आहे. जे आमचे मूळ मूल्य आणि विचारधारेवर आधारित आहे. आमचे 5 आयपीएल खिताब या मुल्यांसाठी आमची असलेली प्रतिबद्धता दर्शवते.' त्यामुळे रोहित शर्मा (Rohit sharma) आणि टीम नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

ब्लू जर्सीमध्ये गोल्डन टच

मुंबई इंडियन्सने म्हटलं की, आधीच्या निळ्या रंग्याच्या जर्सीमध्ये सोनेरी रंगाचा अधिक वापर आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला आरसीबीच्या विरुद्ध होणार आहे. मुंबईने 2011, 2013, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला आहे.