मुंबई: पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने अगदी सहज विजय मिळवला आहे. 7 गडी राखून 14 बॉल बाकी असताना दिल्ली संघाने आपलं लक्ष्य पूर्ण करत पंजाबवर मात केली. दिल्लीच्या विजयामुळे चेन्नईला मोठा तोटा झाला. चेन्नई सुपरकिंग्स संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर दिल्ली संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
युनिव्हर्स बॉस आणि स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलंला दिल्लीच्या बॉलरनं आपल्या घातक फलंदाजीनं आऊट केलं आहे. त्याची स्फोटक खेळी दिल्लीसाठी घातकी ठरू शकली असती. मात्र त्याला रोखण्यात दिल्लीच्या बॉलरला मोठं यश आलं आहे. ख्रिस गेल बोल्ड आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— Simran (@CowCorner9) May 2, 2021
कसिगो रबाडाने ख्रिस गेलला फुलटॉस बॉल टाकला आणि त्यावर ख्रिस गेलनं षटकार आणि चौकार मारायला सुरुवात केली. रबाडाने फुलटॉस पण घातकी बॉल टाकला त्यावर ख्रिस गेलची दांडी उडाली तो बोल्ड आऊट झाला.
केएल राहुलची प्रकृती बिघडल्यानं संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मयंक अग्रवालच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मयंकने कर्णधार म्हणून पंजाबकडून पहिला सामना खेळत असलेल्या मयंकने शानदार फलंदाजी केली. त्याने 58 चेंडूमध्ये 99 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्याच्या डावात त्याने 8 चौकार आणि 4 षटकारही खेळले.