IPL 2021 Points Table : कोण आहे नंबर वन, मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी बॅडन्यूज

धोनीच्या चाहत्यांसाठी मात्र गुडन्यूज

Updated: Sep 24, 2021, 03:25 PM IST
IPL 2021 Points Table : कोण आहे नंबर वन, मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी बॅडन्यूज

IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी प्लेऑफची शर्यत दररोज मनोरंजक होत आहे. निम्म्याहून अधिक लीग सामने खेळले गेले आहेत. अशा स्थितीत प्रत्येक संघ टॉप 4 मध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला टॉप 4 मधून बाहेर व्हावे लागले आहे. एवढेच नाही तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे, कारण संघाचा नेट रन रेट तितका चांगला नाही. अशा प्रकारे मार्क टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्स सध्या आयपीएल 2021 पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, ज्याने 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि संघाच्या खात्यात 14 गुण आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी त्यांच्या 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि संघाच्या खात्यात एकूण 12 गुण आहेत. त्याचवेळी, तिसरे स्थान अजूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताब्यात आहे, ज्यांनी त्यांच्या 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत आणि आरसीबीच्या खात्यात सध्या 10 गुण आहेत. चौथ्या स्थानावर आता कोलकाता नाईट रायडर्सचा कब्जा आहे, ज्यांनी त्यांच्या 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. केकेआरच्या खात्यात 8 गुण आहेत.

पॉईंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. RR च्या खात्यात 8 अंक आहेत. तेवढेच गुण मुंबई इंडियन्सच्या खात्यात आहेत आणि संघाने 9 सामने खेळले आहेत. 4 सामने जिंकल्यानंतर संघाच्या खात्यात 8 गुण आहेत, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट KKR आणि RR पेक्षा कमी आहे. 

पंजाब किंग्स सातव्या क्रमांकावर आहे, 9 सामन्यांपैकी 3 सामने जिंकण्यात तो यशस्वी झाला आहे. PBKS च्या खात्यात फक्त 6 गुण आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद हा शेवटच्या स्थानावर आहे. 8 सामन्यांपैकी फक्त एक सामना ते जिंकू शकले आहेत. संघाच्या खात्यात फक्त 2 गुण आहेत.