IPL 2021 : Rohit Sharma ने नोंदवला नवीन रेकॅार्ड, रैना आणि कोहलीलाही टाकले मागे

आयपीएलमध्ये 5 वेळा आपल्या नावावर विजय नोंदवलेल्या मुंबई इंडियन्सचा शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध  सामना झाला. 

Updated: Apr 24, 2021, 02:12 PM IST
IPL 2021 : Rohit Sharma ने नोंदवला नवीन रेकॅार्ड, रैना आणि कोहलीलाही टाकले मागे title=

चेन्नई : आयपीएलमध्ये 5 वेळा आपल्या नावावर विजय नोंदवलेल्या मुंबई इंडियन्सचा शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध  सामना झाला. या सामन्यात मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 131 धावा केल्या. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरुन त्याने मुंबईसाठी आपले योगदान कर दिलेच परंतु, त्याच बरोबर त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

रोहितचा मोठा विक्रम

रोहित आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त इनिंगमध्ये फलंदाजी करणारा फलंदाज बनला आहे. रोहित शुक्रवारी पंजाबविरुद्ध फलंदीजी करायला मैदानात उतरला. त्याचा हा 200 वा सामना होता. रोहितने डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघाकडून खेळताना हा विक्रम केला आहे.

कोहली आणि रैनाला मागे सोडले

हा विक्रमकरुन रोहित शर्माने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. रोहितनंतर या यादीमध्ये सीएसकेच्या सुरेश रैनाचे नाव आहे. त्याने आतापर्यंत 192 वेऴा फलंदाजी केली आहे. रैना नंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 188 डावात आतापर्यंत फलंदाजी केली आहे.

मुंबईने 5 वेळा विजेतेपद जिंकले

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक म्हणजेच 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. आयपीएलचे विजेतेपद मुंबईने सगळ्या संघापेक्षा जास्त वेळा जिंकल्या आहेत. मुंबईनंतर सीएसकेने 3 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. विजेतेपद जिंकलेल्या संघाच्या यादीत सीएसके दुसऱ्या क्रमांकावर आहे.